नवी दिल्ली : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. कस्तुरीरंगन यांचे शुक्रवारी कर्नाटकाची राजधानी बंगळुरू येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आहेत.वयोमानामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते विविध आजारांनी त्रस्त होते. त्यांची प्राणज्योत काल सकाळी राहत्या घरी मालवली. त्यांचा मृतदेह रामन रिसर्च सेंटर येथे २७ एप्रिलपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या समितीचे ते अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे कुलपती आणि कर्नाटक नॉलेज कमिशनचे त्यांनी अध्यक्षपदही भूषविले होते. राज्यसभेचे सदस्य आणि नियोजन आयोगाचे सदस्य होते.
Fans
Followers